ठाणे: प्रख्यात इतिहास अभ्यासक माजी प्राचार्य डॉ. दाऊद दळवी यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते.
डॉ. दाऊद दळवी हे गेले काही दिवस किडनीच्या विकाराने त्रस्त होते. त्यामुळे सार्वजनिक जीवनातूनही ते काहीसे अलिप्त होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. उद्या सकाळी डॉ. दळवी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते सध्या काम करीत होते. कोकण इतिहास परिषदेची स्थापना करण्यापूर्वी ते ज्ञानसाधना महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत होते.