नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल तब्बल 3 रुपये 38 पैशांनी महागलं आहे तर डिझेलच्या दरात 2 रुपये 67 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आल्यानं सामान्यांच्या खिशाला मात्र चाट बसणार आहे.

 

पेट्रोलचे दर:

 

मुंबई - सध्याचे दर 65.04 रु. - दरवाढीनंतर 68.40 रुपये

 

दिल्ली - सध्याचे दर 60.09 रु. - दरवाढीनंतर 63.47 रुपये

 

कोलकाता - सध्याचे दर 64.18 रु. - दरवाढीनंतर 66.84 रुपये

 

चेन्नई - सध्याचे दर 59.65 रु. - दरवाढीनंतर 63.02 रुपये

 

डिझेलचे दर:

 

मुंबई - सध्याचे दर 52.48 रु. - दरवाढीनंतर 55.15 रुपये

 

दिल्ली - सध्याचे दर 50.27 रु. - दरवाढीनंतर 52.94 रुपये

 

कोलकाता - सध्याचे दर 55.81 रु. - दरवाढीनंतर 58.48 रुपये

 

चेन्नई - सध्याचे दर 51.76 रु. - दरवाढीनंतर 54.43 रुपये