मुंबई :  एप्रिल महिन्यात दररोज सुमारे 45 ते 50 हजार कोविड चाचण्या केल्या जात होत्या. मात्र गेल्या काही दिवसांत चाचण्यांची संख्या कमी झाली आहे.  गेल्या 5 दिवसांत कोविड चाचण्यांची संख्या 40 हजारांच्या खाली गेली आहे आणि आता तर मुंबईत चाचण्यांचं प्रमाण 30 हजारांवर आलं आहे.


22 एप्रिल - 46 हजार चाचण्या  7,410 रुग्ण 


23 एप्रिल- 41, 826 चाचण्या 7,221 रुग्ण 


24 एप्रिल- 39,584 चाचण्या  5,888 रुग्ण 


25 एप्रिल- 40, 298  चाचण्या 5,542 रुग्ण 


26 एप्रिल- 28, 328  चाचण्या  3,876 रुग्ण 


27 एप्रिल- 30, 428  चाचण्या 4,014 रुग्ण
 


आज मुंबईत याठिकाणी लसीचा साठा संपला आहे


ब्रीच कॅन्डी (कंबाला हिल)
खुबचंदानी (कुलाबा)
शुश्रुषा (विक्रोळी)
एशियन हार्ट (बीकेसी)
भाटिया (ताडदेव)
सैफी (चर्नी रोड)
बालाजी (भायखळा)
मसिना (भायखळा)
रहेजा (माहीम)
गुरुनानक (वांद्रे)
ग्लोबल (परळ)
राणे रूग्णालय (चेंबूर)
देसाई रुग्णालय (मालाड)
दळवी प्रसूतीगृह (कुर्ला)
वांद्रे पश्चिम स्थित होली फॅमिली रुग्णालय
वांद्रे पश्चिम स्थित होली फॅमिली रुग्णालय 
चेंबूर स्थित झेन रुग्णालय


मुंबई गेल्या 24 तासात 4014 कोरोना बाधित रुग्णांची नोंद 



मुंबईत गेल्या 24 तासात 4014 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज 8240 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 55 हजार 101 वर पोहोचली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 87 टक्के आहे. सध्या 66 हजार 045 एकूण सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर 68 दिवस आहे. कोविड रुग्णांचा दर 1.01 टक्के आहे. 


1 मे नंतर वयोगटानुसार लसीकरणावर सरकारचा भर 


18 ते 25 वयोगटात, 26 ते 35 वयोगट आणि 36 ते पुढील वयोगटातल्या लोकांना लसीकरण करता येण्याची शक्यता आहे.  त्यानंतर सध्या रजिस्ट्रेशनची जी पद्धत सुरु आहे तीच पद्धत ठेऊन जेवढ्या लस उपलब्ध आहेत. तेवढंच रजिट्रेशन झालेल्या नागरिकांना लस दिली जाईल. सध्या सगळ्यांकडे आरोग्य सेतू ॲप उपलब्ध आहे. त्या ॲपच्या माध्यमातून लसीकरण करता येईल का यावर देखील विचार सुरू आहे. मुंबईत वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरु होत आहेत. त्यामुळे जिल्हापातळीवर देखील असा उपक्रम राबवण्यावर भर आहे. सध्या इंजेक्शन, ऑक्सिजन आणि बेड्सचा तुटवडा असताना राज्यात लावलेला लॉकडाऊन या सर्व परिस्थितीत लसीकरणावर राज्य सरकारला भर द्यायचा आहे.