Mumbai News : महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Discharge) यांना आज ब्रीच कॅंडी (Breach Candy Hospital)रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मंगळवारी त्यांना थकवा आणि भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळपर्यंत त्यांना आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. यावेळी अधिक ताणामुळे त्यांना चक्कर आणि थकवा आला होता, अशात अनेक चाचण्या देखील करण्यात आल्या. 


दरम्यान, मुंडे रुग्णालयात दाखल झाल्याचं कळताच अनेक नेते मंडळी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दाखल झाली होती. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे देखील दाखल झाल्या होत्या. डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपली तब्येत आता चांगली असल्याचं सांगितलं. सोबतच आभार देखील मानले आहेत. 


रुग्णालयातून बाहेर पडताना मुंडे यांनी आता प्रकृती चांगली असून माझ्या प्रकृती साठी प्रार्थना करणारे सर्व कार्यकर्ते,  हितचिंतक तसेच रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करणारे सर्व पक्षाचे नेते मंडळी  व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच मी पुन्हा पूर्वीसारखा बरा होऊन जनसेवेत दाखल होईल असे ते म्हणाले.


दरम्यान, डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे कार्यकर्त्यांनी काही दिवस भेटीसाठी येऊ नये मी स्वतः लवकरात लवकर स्वतः कार्यकर्त्यांना येऊन भेटेल असे आवाहनही त्यांनी केले. 


उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री राजेंद्र शिंगणे, पार्थ दादा पवार, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे, किशोरी पेडणेकर,पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेऊन चौकशी केली.


संबंधित बातम्या


भावाला बघायला धावून आल्या बहिणी; धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी पंकजा-प्रीतम मुंडे ब्रीच कँडीत


Dhananjay Munde News : अजित पवारांनी दिलं धनंजय मुंडेंच्या प्रकृतीसंदर्भात अपडेट, म्हणाले...


Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, कार्यकर्त्यांची रुग्णालयात