मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागल होतं. त्यांच्या या टिकेला प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाचं भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस माझ्यावर टीका करतात कारण त्यांना असं वाटतं की, माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली. तसेच काल जळगावमधील मुक्ताईनगर येथे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिली. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यावर बोलताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गाठीभेटी होत राहिल्या पाहिजेत, असंही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले. तसेच एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील, असा टोलाही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे. 


संजय राऊत म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांना पुढील तीन-साडेतीन वर्ष टीकाच करायची आहे. विरोधा पक्षाचं काम आहे सत्ताधाऱ्यांवर टीका करणं. त्यांची टाका आपण स्विकारली पाहिजे लोकशाहीमध्ये. त्यांनी काय टीका केलीये हे मला माहिती नाही. पण त्यांनी या काळात, कोरोनाचं संकट, महागाई आणि इतर महाराष्ट्रातील प्रश्न आहेत, यावर लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. विरोधा पक्षांनी महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारसोबत काम केलं पाहिजे. काही निवडणुका होतील, त्यावेळी एकमेकांशी आम्ही लढत राहू, संघर्ष करु. लोक जो कौल देतील तो आम्ही स्विकारु." पुढे बोलताना ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस माझ्यावर टीका करतात कारण त्यांना असं वाटतं की, माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली. मी त्यांचं दुःख समजून घेतो. त्यामुळे मी त्यांचे आरोप, टीका समजून घेतो"


खासदार संजय राऊत म्हणाले की, "चांगलं आहे की, विरोधी पक्ष हळूहळू जमिनीवर येतोय. राजकारणात कोणी शत्रू नसतो, ते मित्र आहेत आणि राहतील. काल ते खडसेंच्या घरी गेल्याचं पाहून मला चांगलं वाटलं. त्याआधी ते शरद पवारांच्या घरी गेले. विरोधी पक्ष जमिनीवर येत आहे हे चांगलं आहे. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. पण लोकशाहीत संवाद असलाय हवा, महाराष्ट्रात ही परंपरा आहे. त्यामुळे फडणवीस खडसेंच्या घरी गेले असतील तर स्वागत करायला पाहिजे. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. एकमेकांकडे जात राहिलं पाहिजे."


संजय राऊतांचा आशिष शेलारांवर पलटवार 


"निवडणुका होतील तेव्हा एकमेकाशी लढत राहू, संघर्ष करु. लोक कौल देतील तो स्वीकारु. पण मग आता कशासाठी वाद निर्माण करत आहात?" अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरुन सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींसंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, "माझंही तेच म्हणणं आहे. विरोधी पक्ष उगाच घाई का करत आहे. अशा प्रकारचे निर्णय होत असल्याचं त्यांना कोण सांगत आहे. जर त्यांच्या गुप्तहेरांनी बातमी दिली असेल तर ते चुकीची बातमी देत आहेत. असं काही नाही. काही करायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, निवडणूक आयुक्त सांगतील. तुम्ही लोकांच्या मनात संभ्रम का निर्माण करता?"


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी उद्धव ठाकरे मोदींना पत्र लिहितील असं वक्तव्य केलं होतं. "तोल ढासळलेल्या व्यक्तीवर बोलणं योग्य नाही, त्यांच्यावर उपचार करायचे असतात.", असं म्हणत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Imtiyaz Jaleel : खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल