मुंबई : इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांनी 2012 मध्ये एका नातेवाईकाला शोधण्याची विनंती केली होती. मात्र काही दिवसांनी ती व्यक्ती सापडली असून शोधकार्य थांबवण्याची विनंती केली. मात्र ती व्यक्ती शीना बोरा असल्याचं आपल्याला 2015 मध्ये समजलं, असा दावा मुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारती यांनी आपल्या साक्षीत केला.
बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरणात सोमवारी देवेन भारती यांची मुंबई सत्र न्यायालयात साक्ष झाली. मंगळवारी त्यांची या प्रकरणी उलटतपासणी होणार आहे.
शीना बोरा हत्या प्रकरण उजेडात आल्यानंतर आपण 2015 मध्ये खार पोलिस स्टेशनला जाऊन दोन जबाब नोंदवले असल्याची माहिती भारती यांनी दिली. 2002 ते 2007 या काळात परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयात असताना इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांच्याशी आपली ओळख झाली असं भारती यांनी सांगितलं.
व्हिसाची मुदत वाढवून घेण्यासाठी मुखर्जी दाम्पत्य कार्यालयात आले असताना त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर थेट 2012 मध्ये इंद्राणी आणि पीटर यांची पुन्हा भेट झाली, असं भारती यांनी आपल्या साक्षीत सांगितलं.
दोघांनी मला त्यांच्या एका नातेवाईकाचं ठिकाण शोधून काढण्याची विनंती केली आणि एक मोबाईल नंबर दिला. त्यानंतर काही दिवसांनी आमच्या नातेवाईकाचा शोध लागला असून यातील पोलिस तपास थांबवण्यात यावा अशी विनंती केली.
2015 साली जेव्हा शीना बोरा प्रकरणाचा उलगडा झाला तेव्हा मी तपास करणाऱ्या टीमचा भाग म्हणून खार पोलिस स्टेशनला गेलो होतो. त्यावेळी 2012 मध्ये मुखर्जी कुटुंबीयांनी मला दिलेला नंबर आणि खार पोलिस स्टेशनमध्ये 2015 चा नंबर एकच असल्याचं माझ्या लक्षात आलं, असंही भारती यांनी आपल्या साक्षीत म्हटलं आहे. ही माहिती आपण पोलिस निरीक्षक अलखनुरे यांना दिली असल्याचंही भारती यांनी साक्षीत दिली.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंद्राणी-पीटरने 2012 मध्ये शीनाला शोधायला सांगितलेलं : देवेन भारती
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
02 Jul 2018 05:57 PM (IST)
बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरणात सोमवारी मुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारती यांची मुंबई सत्र न्यायालयात साक्ष झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -