मुंबईत बांधकाम विकासकाची गळफास घेऊन आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 08 Oct 2017 06:45 PM (IST)
जयेश यांनी शुक्रवारी सकाळी रुनवाल एन्क्लेव्ह या इमारतीतील घराची चावी मुलाकडून घेतली आणि तिथेच गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुंबई : मुलुंडमध्ये बांधकाम व्यावसायिक आणि विकासकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जयेश पटेल असं आत्महत्या केलेल्या विकासकाचं नाव आहे. गोवर्धननगरमध्ये राहणारे जयेश पटेल शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख होते. जयेश यांनी शुक्रवारी सकाळी रुनवाल एन्क्लेव्ह या इमारतीतील घराची चावी मुलाकडून घेतली आणि तिथेच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी जयेश दुपारी दीड वाजता एका मित्राला भेटले, मात्र त्यानंतर 4 वाजेपर्यंत जयेश यांच्याशी संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी घर गाठलं. दुसऱ्या चावीने घर उघडलं असता तिथे त्यांना जयेश यांनी गळफास घेतल्याचं दिसलं. नातेवाईकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. मागील काही दिवसांपासून जयेश व्यवसायात चिंताग्रस्त होते. यामुळे कदाचित त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.