OBC Reservation : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा चुका करत आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत (OBC reservation) गंभीर दिसत नाहीत. राज्यातील ओबीसींची खरी आकडेवारी समोर येणार नाही. त्यामुळे ओबीसीचे कायमचे नुकसान होईल, असं मत अभ्यासक हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी व्यक्त केलं.


ओबीसीचे राजकीय आरक्षण आम्ही मिळवून देणारच, त्यासाठी आघाडी सरकारकडून झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्यात येईल. ओबीसींचे नेते छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्याबरोबर चर्चा करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर इथल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते.


परंतु आमचं म्हणणं आहे की, आघाडी सरकारने केलेल्या चुका या दुरुस्ती करण्यालायक नसून ओबीसीचा डाटा मिळवण्यासाठी आडनावावरुन केलेला सर्वेक्षण संपूर्णत: रद्द केले पाहिजे. दुसरे अत्यंत महत्त्वाचे असे की, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार या दोन मंत्र्यांच्या चुकीमुळे राज्यातील ओबीसींचे आरक्षण घालवण्यात आले आणि एकूण 16 महिने फुकट गेले. कारण त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णयच कळला नाही. यांना इम्पिरिकल डेटा म्हणजे काय त्याचा नेमका अर्थ काय हेच कळले नाही. हे ओबीसीचे नेते असू शकत नाहीत, यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करत असतील तर ओबीसी आरक्षणाचे काही खरे नाही. 


भाजपच्या प्रभावामुळे आणि चुकीच्या पद्धतीने जर देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय मिळवून दिले तरी ओबीसींची खरी आकडेवारी समोर येणार नाही आणि त्यामुळे ओबीसीचे कायमचे नुकसान होईल, अशी खंत ओबीसीचे कायमचे नुकसान होईल, अशी खंत ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली.


ओबीसी आरक्षणाची लढाई आता शिंदे-फडणवीस सरकारने लढावी : छगन भुजबळ
"ओबीसी आरक्षणाची  लढाई आता सुप्रीम कोर्टात लढायची आहे, शिंदे-फडणवीस सरकारने ती लढावी. आम्ही योग्य काम केलं आहे. आता नवीन सरकारने योग्य काम करावं, आम्हाला खात्री आहे की आरक्षणासह निवडणुका होतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal )यांनी व्यक्त केला आहे.  "ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी इम्पिरिकल डेटा आवश्यक आहे. त्यासाठी बांठिया आयोग नेमला असून त्यांनी चांगलं काम सुरु केलं आहे. मध्य प्रदेशप्रमाणे डेटा गोळा करुन घ्या म्हणून सांगितलं आहे. आम्ही मतदार यादीवरुन डेटा गोळा केला. हा डेटा बांठिया कमिशनला आठ दिवसांपूर्वी दिला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जास्त जबाबदारी आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटलं.