मुंबई : MPSC कडे 2019 च्या प्रलंबित तीन परीक्षेतील मुलाखतीसाठी पात्र 6998 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. 2019 मधील दोन परीक्षांमधील 451 पदं आणि 2020 च्या आठ परीक्षांमधील 1714 पदे भरण्याची कारवाई महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्वरित करणार आहे, अशी माहिती राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार दिली. UPSC च्या धर्तीवर MPSC मध्ये काही बदल करता येईल का? यावर देखील विचार सुरु असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.


यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीमध्ये कारभाराबाबत काही बदल करणे गरजेचं आहे. यूपीएससीमध्ये ज्याप्रमाणे पुढील एका वर्षाच्या परीक्षांचा कार्यक्रम जाहीर केला जातो, त्याचप्रमाणे एपीएससीतही परीक्षांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो का? याबाबत विचार सुरु आहे. एपीएससीची सदस्य संख्या  सहा आहे. त्यातील काही जागा रिक्त आहेत, त्या जागा 31 जुलैपर्यंत भरणार असल्याचं आधी जाहीर केलं आहे. मात्र एमपीएससीमध्ये सदस्य संख्या सहा ठेवून भागणार नाही, तिथे 11 किंवा 13 सदस्य गरजेचे आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं अजित पवारांनी म्हटलं. 


यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी उमेदवारांच्या वयोमर्यादेबाबतही विचार करणे गरजेचं आहे. कारण सध्या 43 व्या वर्षापर्यंत उमेदवार परीक्षा देऊ शकतात. मात्र जर एखादा उमेदवार 43 व्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण झाल्यास नोकरीत रुजू होईपर्यंत त्याचे वय 45 वर्ष होईल. त्यामुळे पुढे त्या उमेदरवाराला केवळ 10-15 वर्ष काम करण्याची संधी मिळेल. याबाबतही काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. मी याबाबत काहीही मत व्यक्त करत नाही, मात्र हा विषय देखील समोर आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.


राज्यातील विविध विभागातील 15,511 रिक्त पदांची एमपीएससीकडून भरती करण्यात येणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. यामध्ये गट अ- 4417,  गट ब- 8031, गट क- 3063 अशी एकूण 15,511 इतकी पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली.  



इतर महत्वाच्या बातम्या