मुंबईत रिक्षाच्या धडकेत हरणाचा मृत्यू, रिक्षाचालकही जखमी
एबीपी माझा वेब टीम | 12 May 2017 07:42 AM (IST)
मुंबई: मुंबईच्या गोरेगाव परिसरात काल (गुरुवार) रात्री एक हरिण आणि रिक्षाचा विचित्र अपघात घडला. या अपघातात हरणाचा जागीच मृत्यू झाला आहे. रिक्षा आणि हरणामधील ही धडक इतकी जबरदस्त होती की यामध्ये रिक्षाही रस्त्यावर पूर्णपणे उलटली. त्यामुळे रिक्षाचालक देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या परिसरापासून जवळच बोरीवली नॅशनल पार्क आहे. उन्हाळा असल्याने पाण्याच्या शोधात हे हरिण जंगलाच्या बाहेर आल्याच अंदाज वर्तवण्यात येतो आहे.