मुंबईच्या कु्र्ला रेल्वे यार्डात अज्ञात तरुणाचा मृतदेह
एबीपी माझा वेब टीम | 20 Jan 2017 07:39 AM (IST)
मुंबई : मुंबईच्या कुर्ला रेल्वे यार्डात पुन्हा एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. काल संध्याकाळी हा मृतदेह यार्डात आढळला आहे. कुर्ला रेल्वे यार्डात मालगाडी जाणाऱ्या ट्रॅकवर हा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्यानं त्याची ओळख पटवणं कठीण झालं आहे. 25 ते 30 वयोगटातील हा युवक असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कुर्ला रेल्वे पोलीस आणि टिळक नगर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. गेल्या 8 तारखेला रात्री टिळकनगर स्टेशन जवळ यार्डात एका सुटकेसमध्ये 12 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला होता. त्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यातही पोलिसांना अपयश आलं आहे.