मुंबई: भाजप आणि शिवसेनेमध्ये आता जागावाटपावरुन तणाव वाढला आहे. जिथं भाजपचा आमदार आहे तिथं शिवसेनेनं जागा सोडाव्या. अशी मागणी भाजपकडून करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे.


जागावाटपामध्ये सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये बरीच घासघीस सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील तणावही वाढला आहे. पण शिवसेनेनं जर भाजपचा हा प्रस्ताव मान्य केला तर काही विद्यमान नगरसेवकांच्या काही जागा शिवसेनेला भाजपासाठी सोडाव्या लागतील. त्यामुळे आता भाजपच्या प्रस्तावावर शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, भाजपने मुंबई महापालिकेसाठी तयार केलेल्या 114 जागांच्या यादीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. आज रात्री भाजप आणि शिवसेना एकमेकांची यादी आदान प्रदान करण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, शिवसेना खासदार आणि युतीच्या चर्चेतील नेते अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं आहे की, 'युतीबाबत झालेल्या दोन बैठकीमधून फार काही निष्पन्न झालेलं नाही. एकीकडे युतीबाबत चर्चा सुरु असताना दुसरीकडे जर त्यांचे नेते काही वक्तव्य करीत असतील तर ती त्यांनी थांबावावी. नाहीतर युतीच्या चर्चेत व्यत्यय येईल.'

संबंधित बातम्या:

'बोलबच्चनगिरी करणाऱ्यांना आवरा', अनिल देसाईंचा भाजपला इशारा


 

भाजपच्या 114 जागांच्या यादीवर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब