नालासोपारा : मुंबईतील नालासोपाऱ्यातून अपहरण झालेल्या सहा वर्षीय चिमुरडीची गुजरातमध्ये हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हत्या करुन तिचा मृतदेह महिला स्वच्छतागृहात फेकून देण्यात आला होता.


अंजली संतोष सरोज या चिमुरडीचं अपहरण करण्यात आलं होतं. नालासोपारा पूर्वेच्या विजयनगर भागातील साई अर्पण अपार्टमेंट या सोसायटीच्या समोरुन शनिवारी एका महिलेने तिचं अपहरण केलं होतं. आरोपी महिला अंजलीला घेऊन जाताना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

गुजरातमधील नवसारी रेल्वे स्थानकातील महिला स्वच्छतागृहात रविवारी रात्री या मुलीचा मृतदेह आढळला. या बाबत तुलिंज पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही