भाच्याच्या लग्नाचं दाऊदला आमंत्रणच नाही!
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2016 10:08 AM (IST)
मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा भाचा अलीशाह पारकर याचा लग्न सोहळा आज मुंबईत पार पडला. दाऊद स्काईपद्वारे लग्नाला हजेरी लावणार अशी चर्चा गेले दोन दिवस सुरु होती. पण प्रत्यक्षात या लग्नाचं दाऊदला आमंत्रणच नसल्याचं कळतं आहे. गेल्या काही दिवसात पारकर कुटुंबात दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे हा विवाह सोहळा अगदी साध्यासोप्या पद्धतीने पार पडला. दरम्यान, आज रात्री 9 वाजता अलीशाह पारकर याच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. पंचतारांकित हॉटेलमधल्या या सोहळ्यासाठी अनेक बड्या व्यक्तींना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे दाऊद या सोहळ्यात जरी सहभागी होणार नसला तरी गुप्तचर यंत्रणा या सोहळ्यावर करडी नजर ठेऊन असणार आहे.