मुंबई : जकात चुकवून आणलेल्या सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या तब्बल 50 बॅगा मुंबई सेंट्रलजवळ जप्त करण्यात आल्या आहेत. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील जकात विभागात मुद्देमालाची मोजदाद सुरु होती. यावेळी विधी समिती अध्यक्षा उज्वला मोडक यांनी जकात चोरी पकडून दिली.
कारवाईत सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या तब्बल 50 बॅगा हस्तगत करण्यात आल्या. जप्त केलेल्या मालाची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे.