मुंबई : सनबर्न फेस्टिव्हलमध्ये फ्रेन्च डीजे डेव्हिड गेटाचा मुंबईतील कॉन्सर्ट आता रविवारी म्हणजेच 15 जानेवारी रोजी होणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्याचा दावा सनबर्नच्या आयोजकांनी केला आहे.

49 वर्षीय डेव्हिड गेटा आता मुंबई आणि दिल्लीत एकाच दिवशी परफॉर्म करणार आहे. मुंबईत उद्या दुपारी 11 ते 4 दरम्यान त्याचा कॉन्सर्ट आहे. तर संध्याकाळी राजधानीत त्याचा कॉन्सर्ट होणार आहे.

सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे काय?


 

सनबर्नने सुरुवातीला मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर शुक्रवारी इंटरनॅशनल म्युझिक फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं. मात्र आवश्यक त्या परवानग्या न घेतल्यामुळे मुंबई महापालिकेने रेसकोर्सवर कार्यक्रम आयोजित करायला नकार दर्शवला. तसंच या कार्यक्रमाचं तिकीट खरेदी करु नये, असं आवाहनही केलं.

त्यानंतर सनबर्नने बीकेसी ग्राऊंडवर कार्यक्रम घेण्याचं ठरवलं. मात्र मुंबई पोलिसांनीही कार्यक्रमाला परवानगी नाकारली. त्यामुळे शुक्रवारचा कार्यक्रम रद्द झाला होता.

परंतु मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळाली असून बीकेसीमध्येच कॉन्सर्ट होणार असल्याची माहिती परसेप्ट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अधिकारी हरिंदर सिंह यांनी दिली आहे.


मुंबईतल्या बीकेसीत होणारा सनबर्न फेस्टिव्हल रद्द



सनबर्नच्या शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमाला सुमारे 4000 प्रेक्षक उपस्थित राहतील, असा आयोजकांचा अंदाज होता. दरम्यान शुक्रवारच्या कॉन्सर्टची तिकीटं अधिकृत असल्याचंही हरिंदर सिंह यांनी सांगितलं.

बंगळुरुमधील छेडछाडीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सनबर्नमधील डेव्हिड गेटाचा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला होता. हैदराबादमध्ये आज संध्याकाळी डेव्हिड गेटाचा कॉन्सर्ट होणार आहे.

संबंधित बातम्या

‘सनबर्न’ला आणखी एक दणका, दंडाची रक्कम 1 कोटींवर


सनबर्न फेस्टिव्हलला 62 लाखांचा दंड


पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा!


पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला ‘सनातन’चा विरोध