Darshan Solanki IIT Bombay: मुंबई आयआयटीचा विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात आणखी मोठा ट्विस्ट समोर आला. FIR दाखल करताना पोलिसांनी छळ केल्याचा आरोप दर्शन सोळंखीच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीकडून एफआयआर दाखल करताना दबाव आणि छळ केला जात असल्याचा दर्शन सोळंकीच्या वडिलांनी आरोप केल्यानंतर आता खळबळ उडाली आहे.
दर्शन सोळंकीच्या वडिलांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. मुंबई आयआयटीमध्ये शिकत असलेल्या दर्शन सोळंकी या विद्यार्थ्यांने 12 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली आहे. झाली
या आत्महत्येनंतर विद्यार्थी संघटनांकडून आणि दर्शन सोळंकी यांच्या वडिलांकडून आत्महत्येसाठी जातीभेदाचे कारण असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणात सखोल चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे.
एसआयटीला 3 मार्च रोजी दर्शन सोळंकीने आत्महत्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोटसुद्धा मिळाली. त्यानंतर या सगळ्या प्रकरणांमध्ये जातीभेदाचे मुख्य कारण असल्याचं असल्याचं समोर आलं. तशा जबाबानंतर पोलिसांनी या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्याचं दर्शन सोळंकीच्या वडिलांनी पत्रात नमूद केला आहे
पोलिसांनी तयार केलेल्या जवाबानुसार गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं पोलिसांकडून दर्शनच्या कुटुंबियांना सांगण्यात आलं आणि त्यामध्ये जातीभेदाचे कारण काढून टाकण्यात आल्याचं दर्शनच्या वडिलांचे म्हणणं आहे.
त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला असून या प्रकरणांमध्ये एसआयटीमध्ये नेमले गेलेले पोलीस अधिकारी दर्शन सोळंकीच्या कुटुंबीयाचा छळ करत असून एक प्रकारे दबाव टाकत आहेत असा आरोप करत दर्शनच्या वडिलांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा आणि नेमलेल्या एसआयटीमधील अधिकाऱ्यांवर योग्य ती ॲक्शन घेतली जावी अशी विनंती या पत्रामध्ये करण्यात आली आहे.
दर्शन सोळंकी हा विद्यार्थी गुजरातमधील अहमदाबाद येथील असून तो आयआयटीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता विद्यार्थी वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून त्यााने आत्महत्या केली. यानंतर पवई पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आला होता.
ही बातमी वाचा :