Dahihandi 2024: ठाणे, मुंबईत गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार; जय जवान यंदा विश्वविक्रम रचणार?
Dahihandi LIVE: गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारबरोबरच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज झाली आहेत.
मागाठाणे महायुती आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट याच्या वतीने आयोजित दहीकाला उत्सवाला सुरुवात. या तारामती महिला दहीकाला पथक यांना विशेष स्थान. मागाठाणे आमदार प्रकाश सुर्वे , राज प्रकाश सुर्वे युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य यांच्यावतीनं आयोजन करण्यात आलंय. तारामती चॅरिटेबल ट्रस्टचं हे 18 वं वर्ष आहे. जागतिक विश्वविक्रम रेकॉर्ड केलेले दहीकाला पथक देखील या ठिकाणी थर लावून या दहीकाला सलामी देणार आहेत. मराठी हिंदी कलाक्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेते हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खासदार श्रीकांत शिंदे राजकीय नेते उपस्थित राहणार
आज राज्यभर दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय. अनेक ठिकाणी मोठमोठे थर लावून दहीहंडी फोडली जातेय. गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत देखील साईंच्या मंदिरात दहीहंडी फोडून काल्याचे किर्तन पार पडले. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांच्यासह साई मंदिर पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. दुपारी 10 ते 12 या वेळेत काल्याचे किर्तन झालं आणि त्यानंतर साईस मंदिरात दहीहंडी फोडून या उत्सवाची सांगता करण्यात आली.
मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाने विक्रोळीच्या टागोर नगर परिसरातील दहीहंडीला 9 थर रचून सलामी दिली. फोटो पाहण्यासाठी क्लिक करा.
ठाण्यात रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी गोविंदा पथकांचे आकर्षण ठरते. याठिकाणी आज 9 थर लावले जाण्याची शक्यता आहे. महिला गोविंदा पथकांचीही संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीला हजेरी.
ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी. मोठ्या संख्येने गोविंदा पथक सलामी देण्यासाठी हजर आहेत. प्रथम बक्षीस - 25 लाखांचं आहे. मुंबई व ठाणे परिसरातले दहीहंडी पथक सलामी देत आहेत, जल्लोष सुरु आहे
मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाने विक्रोळीच्या टागोर नगर परिसरातील दहीहंडीला 9 थर रचून सलामी दिली. पहिल्याच प्रयत्नात जय जवान पथकाने 9 थर रचले.
स्वर्गीय दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावरची हंडी ही प्रथा परंपरा कायम ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही या महोत्सवाला वेगळे वलय निर्माण करुन दिले. यंदा पुन्हा एकदा त्याच दिमाखात यंदा अनुभवायला मिळणार आहे. टेंभीनाक्यावरच्या हंडीत बक्षीसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षीसे रोख स्वरुपात देण्यात येतात. खास मराठमोळा साज दिमाखदार सोहळा व आकर्षक बक्षीसे यामुळे ठाण्यातील ही परंपरा असलेली हंडी ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखली जात आहे.
मुंबई आणि ठाण्यातील हजारो गोविंदा पथकांसाठी ठाण्यातील टेंभी नाका या ठिकाणी केली जेवणाची सोय. काही वेळातच दहीहंडीला सुरुवात होणार आहे. महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार ,बाळासाहेब ठाकरे ,आनंद दिघे यांचे टेभी नाक्यावरती बॅनर झळकताना पाहायला मिळत आहे.त्यामुळे या हंडीला राजकीय आणि कलाकार मंडळी हजेरी लावणार आहे.
जय जवान गोविंदा पथक आपल्या मैदानातुन मुंबई ठाणे परिसरामध्ये दहीहंडी फोडण्यासाठी जात आहेत. बाळ गोपाळांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जय जवान गोविंदा पथक आता जोगेश्वरी पूर्व परिसरातून विक्रोळी टागोर नगर परिसरामध्ये दहीहंडी फोडण्यासाठी जात आहेत.
मुंबईच्या दादर परिसरातील आयडियलच्या दहीहंडीच्या ठिकाणी गोविंदा पथके यायला सुरुवात. महिला गोविंदा पथकाकडून थोड्याचवेळात हंडी फोडली जाणार.
दहीहंडी उत्सवानिमित्त (Dahihandi Mumbai Thane) मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या असून या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांसारख्या मोठ्या हंड्या उभारण्यात आल्या आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
Dahihandi 2024: मुंबईत अगदी सकाळी दहीहंडी उत्सवाच्या खऱ्या अर्थाने दादर पश्चिमेला असलेल्या आयडियलच्या दहीहंडीने सुरुवात होते. याच ठिकाणी असलेल्या श्री साई दत्त मित्र मंडळाच्या दहीहंडीच यंदाचे हे पन्नासाव्या वर्ष आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून इथे दहीहंडी फोडायला सुरुवात होईल. मुंबईतील विविध ठिकाणाहून गोविंदा पथक ही दहीहंडी फोडायला सज्ज झाले आहेत. विशेष करून महिला गोविंदा पथक ही दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.
पार्श्वभूमी
Dahihandi LIVE मुंबई: दहीहंडी उत्सवानिमित्त (Dahihandi Mumbai Thane) मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या असून या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांसारख्या मोठ्या हंड्या उभारण्यात आल्या आहेत. दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात. या गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारबरोबरच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज झाली आहेत.
दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या उत्साहात तरुण सकाळी घराबाहेर पडतात. मात्र हा उत्साह शिगेला पोहचण्याबरोबरच गोविंदा जखमी होण्याच्या घटना घडतात. मागील काही वर्षांमध्ये दहीहंडी फोडण्यामध्ये गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांत जखमी गोविंदांची संख्या 200 वर पोहचली आहे. दरवर्षी तरुण गोविंदा मोठ्या प्रमाणात जखमी होत असल्याने व त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारच्या तसेच महानगरपालिकेची केईएम, शीव, नायर व कूपर ही रुग्णालये सज्ज झाली आहेत. नायर रुग्णालयामध्ये ट्रॉमा, शल्यचिकित्सा विभाग आणि अस्थिव्यंगशल्य चिकित्सा विभागात जखमी गोविंदांसाठी 8 ते 10 खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, आवश्यक सर्व औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. अत्यावश्यक शल्यचिकित्सा विभाग व अस्थिव्यंगशल्य चिकित्सा विभागातील डॉक्टरांना सज्ज ठेवण्यात आले असून, जखमी गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -