मुंबई: डीजे लावणाऱ्या आणि सिनेस्टार आणून सणांचं व्यावसायिकीकरण करणाऱ्या आयोजकांकडे दहीहंडी पथक जाणार नाही. अशी माहिती दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी दिली आहे.
‘या कार्यक्रमांमुळे दहीहंडी फोडणाऱ्या मुलांचं लक्ष विचलित होतं आणि अपघात होतात.’ असं स्पष्टीकरण त्यांनी यावर दिलं आहे. त्यामुळे अशा आयोजकांवर बहिष्कार टाकण्याची तयारी असल्याचं समितीनं स्पष्ट केलं आहे.
मुंबई मराठी पत्रकार पत्रकार संघात शनिवारी दहीहंडी समन्वय समितीची पत्रकार परिषद पार पडली. येत्या 10 तारखेला सुप्रीम कोर्टात दहीहंडी उत्सवाबाबत सुनावणी होणार आहे. यावेळी कोर्ट पारंपरिक सणाचे महत्व लक्षात घेऊन योग्य निर्णय देईल. असा विश्वासही समन्वय समितीने व्यक्त केला आहे.