मुंबई : सीएसएमटी स्थानकाबाहेरील पादचारी पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला तर 39 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर आता दादर स्थानकातील सीएसएमटीच्या दिशेकडील बीएमसीचा पादचारी पूल दुरुस्तीसाठी उद्यापासून बंद करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी ही माहिती दिली आहे.


शुक्रवारी पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली. या पाहणीत पूल धोकादायक असल्याचे लक्षात येताच पुलाची तात्काळ डागडुजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुरुस्तीसाठी हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे.


पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 च्या पायऱ्या पुढील 13 दिवसांसाठी म्हणजे 17 मार्चपासून 29 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळील पुलाच्या काही भागाची दुरुस्ती करण्यासाठी हा पूल तीन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे 17 मार्च ते 16 जूनपर्यंत पादचाऱ्यांना रेल्वेचा पादचारी पूल वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.


सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिमध्ये त्रुटी आढळल्याने मुंबई महापालिकेला खडबडून जाग आली आहे. आता मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या नोटीसा मुंबई महापालिकेनं दिल्या आहेत. पुलांचं नव्यानं ऑडिट करून एका महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिकेनं दिल्या आहेत.


सीएसएमटी पूल दुर्घटना


मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनजवळ पादचारी पुलाचा भाग गुरुवारी (14 मार्च) संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कोसळला होता. पूलाचा भाग कोसळल्याने तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण गंभीर जखमी झाले आहेत.


सीएसटीएम स्टेशनजवळ झालेल्या या पूल दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (35), रंजना तांबे (40), भक्ती शिंदे (40), जाहीद सिराज खान (32), तपेंद्र सिंह (35) मोहन कायगुंडे अशा सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. शिवाय, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकारकडून करण्यात येणार आहे. तसेच दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.



संबंधित बातम्या


पूल कोणाचा? रेल्वे प्रशासनाची आणि पालिकेची एकमेकांवर टोलवाटोलवी


मुंबई पूल दुर्घटना : मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपये, पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट चुकीचं, दोषींवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री 


सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे 


बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, धनंजय मुंडेंची टीका


पुलाचे ऑडिट झाले नाही, या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार : स्थानिक नगरसेविकेचा आरोप


'तो' पूल 100 टक्के धोकादायक नव्हता, दुर्घटनेची चौकशी केली जाईल : विनोद तावडे


रेड सिग्नलमुळे अनेक जीव वाचले, सिग्नल असल्याने वाहतूक थांबली, मोठी जीवितहानी टळली