मुंबई : मुंबईमधील मध्यवर्ती ठिकाण कोणतं असा प्रश्न विचारला तर पटकन दादर (Dadar) हेच नाव सगळ्यांकडून ऐकायला मिळेल. दादर स्थानक हे मुंबईतील सर्वात जास्त वर्दळीचे स्थानक आहे. दादरला मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे असे दोन भाग येतात. दादर रेल्वे स्थानकावरील गाड्या बदलताना प्रवाशांमध्ये  प्लॅटफॉर्म क्रमांकावरून कायम गोंधळ पाहायला मिळतो. हा गोंधळ कमी करण्यासाठी दादर रेल्वे स्थानकावर 9 डिसेंबरपासून मोठे बदल करण्यात येणार आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म्सना नवीन क्रमांक लागू होणार आहे.


दादर स्थानकावर एकूण 15 प्लॅटफॉर्म आहेत.यापैकी पश्चिम रेल्वेवरील फलाटांना 1 ते 7 क्रमांक तर मध्य रेल्वेवरील फलाटांना त्यापुढील क्रमांक म्हणजेच 8 ते 15 क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम मार्गावरील फलाटाच्या सारख्या क्रमांकामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो.. त्यामुळे हाच संभ्रम दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं निर्णय घेतला आहे.


दादर स्थानकावर एकूण 15 प्लॅटफॉर्म


मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील दादर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मचे क्रमांक सारखे असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दादर स्थानकावर एकूण 15 प्लॅटफॉर्म आहेत.  मुंबईहून पुणे, वडोदरा तसेच नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांचा तर मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा दादरला थांबा आहे. मध्य रेल्वे विभागातील आठ प्लॅटफॉर्म, लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी टर्मिनल प्लॅटफॉर्म आणि पश्चिम रेल्वे विभागात सात प्लॅटफॉर्म आहेत. 


प्लॅटफॉर्मच्या संख्या सारख्या असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम


  दादर स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य व पश्चिम ह्या दोन्ही मार्गांवर असून उपनगरी रेल्वेखेरीज पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेवरील अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील दादरहून सुटतात. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील दादर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मच्या संख्या सारख्या असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो त्यामुळे कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 7 तेच राहतील परंतु मध्य रेल्वेवर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 8 चे नाव 8 ते 14 असे करण्यात येणार आहे  सध्या मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक 2 ची रुंदी वाढवण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 सोडण्यात आला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक  1 चे नाव प्लॅटफॉर्म क्रमांक  8 करण्यात येणार आहे. 


  9 डिसेंबरपासून होणार बदल  


 उपनगरीय प्लॅटफॉर्म क्र. 1- 8 होईल, प्लॅटफॉर्म 2 रुंदीच्या विस्तारासाठी काम केले जाणार आहे.  प्लॅटफॉर्म क्र. 3 -9 होईल, प्लॅटफॉर्म क्र. 4-10 होईल , प्लॅटफॉर्म क्र. 5 -11 होईल, प्लॅटफॉर्म क्र. 6-12 होईल  आणि विद्यमान दादर टर्मिनस प्लॅटफॉर्म क्र. 7- 13 होईल आणि प्लॅटफॉर्म क्र. 8 -14 होईल.  प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी. प्रवाशांमधील संभ्रम दूर करण्यासाठी हे बदल 9 डिसेंबर 2023 पासून लागू केले जातील.


हे ही वाचा :


मराठी माणसाला घर नाकारणाऱ्या बिल्डिंगवर कारवाई होणार का? मिंधे-भाजपा धाक दाखवणार? मुलुंडच्या घटनेनंतर आदित्य ठाकरे बरसले