मुंबई : पुण्यातील बांधकाम उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांनी आज राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली.
डीएसके सध्या गुंतवणुकदारांचे पैसै थकल्यानं अडचणीत आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना निर्वाणीचा इशारा देत गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही.
डीएसके, पैसे उसने घ्या किंवा भीक मागा, पण रिकामे येऊ नका : हायकोर्ट
दरम्यान, कालच्या सुनावणीत हायकोर्टाने चांगलंच खडसावलं आहे. 'रिकाम्या हातानं येऊ नका, पैसे उसने घ्या, भीक मागा, काहीही करा, लोकांचे पैसे कधी परत करणार याची माहिती द्या, असे मुंबई हायकोर्टाने डी. एस. कुलकर्णी यांना काल बजावलं होतं.'
तसेच, 13 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीत डीएसकेंना पत्नी हेमांगीसह हायकोर्टात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत तपास अधिकाऱ्यांपुढे हजर राहण्याचे निर्देश डीएसकेंना देण्यात आले आहेत आणि डीएसकेंवर MPID अॅक्टखाली काय कारवाई केली जाऊ शकते याचा तपशील सादर करा, असे राज्य सरकारला निर्देश देण्यात आले आहेत.
धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी डीएसके आणि अजित पवारांची भेट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Feb 2018 03:11 PM (IST)
पुण्यातील बांधकाम उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांनी आज राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -