Cyber Terrorisms: सायबर दहशतवाद प्रकरणात पहिल्यांदाच सॉफ्टवेअर इंजिनिअर आरोपीला मुंबई सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अनिस शकिल अन्सारी असं याचं नाव आहे. एका अमेरिकन स्कूलवर सुसाईड बॉम्ब हल्ला करण्याचा कट प्रकरणात 2014 साली एटीएसने अनिस अन्सारीला अटक केली होती.


आरोपी अनिस शकिल अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एटीएसच्या गुन्ह्यातील प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निकाल दिला आहे. 2014 च्या एका प्रकरणात आरोपी अनिस अन्सारी याला अटक करण्यात आली होती.  बीकेसी एका अमेरिकन स्कुलवर सुसाईड बॉम्ब हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता. या कटाची माहिती मिळताच एटीएसने अनिस अन्सारी याला अटक केली होती. 


सायबर दहशतवादाबाबत हा पहिला निकाल आहे. अनिस शकीर अन्सारी या आरोपीला सायबर दहशतवाद कायद्याअंतर्गत 5 वर्षांची आणि आजीवन शिक्षा सुनावली. दोषी सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. खोटे प्रोफाइल बनवून बॉम्ब बनवण्याचे षडयंत्र आखले होते. अमेरिकन शाळेवर अटॅक करण्याचा कट रचला होता.