Platform ticket increased : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर देशभरात मोठ्या उत्सवात दिवाळी सण साजरा केला जात आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा हाऊसफुल झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील गर्दीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याशिवाय मुंबईत रेल्वेनं येणाऱ्या अथवा मुंबईतून रेल्वेनं जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकातील वाढती गर्दी पाहून मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. ही वाढ मोजक्याच स्थानकात आणि तात्पुरत्या स्वरुपाची असेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. 22 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर यादरम्यान महत्वाच्या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये करण्यात आली आहे, असेही मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. 


दिवाळीमुळे रेल्वे स्थानकावर गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्लॅटफॅार्म तिकिटांच्या किंमतीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात वाढ करण्यात आली आहे. सीएसएमटी (CSMT), दादर (Dadar), ठाणे (Thane), कल्याण (Kalyan), लोकमान्य टीळक टर्मिनस (LTT) आणि पनवेल रेल्वे स्थानकावर (Panvel Railway stations) प्लॅटफॅार्म तिकिटाची किंमत 50 रुपये करण्यात आले आहे. अशी माहिती मध्य रेल्वेनं ट्वीट करत दिली आहे. 


कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून दिवाळीसह अन्य सण गर्दीत साजरे करण्यावर निर्बंध लावण्यात आले होते. सध्या महाराष्ट्रासह देशभरातील कोरोनाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे सर्व काही पूर्वरत होत आहे. त्यामुळे बाजरपेठासह रेल्वे स्थानकातही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. वाढती गर्दी पाहून मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटांमध्ये मध्य रेल्वेनं वाढ केली आहे. 






दरम्यान, महाराष्ट्रामध्ये तीन नव्या कोरोना व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. दिवाळीच्या सणामुळे सर्वच ठिकाणी गर्दी वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागानं कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहान केलं आहे. 


आणखी वाचा :
Diwali 2022 : दादरमध्ये दिवाळीनिमित्त झुंबर कंदीलांचं विशेष आकर्षण; ग्राहकांची विविध वस्तू खरेदीसाठी लगबग