सीएसटी स्टेशन तब्बल तासभर अंधारात
एबीपी माझा वेब टीम | 17 Jan 2017 11:33 PM (IST)
मुंबई: मुंबईतलं सीएसटी स्टेशन आज सुमारे तासभर अंधारात होतं. रात्री ९ ते १० या तासभरात दोनदा स्थानक आणि परिसरातील लाईट गेली. पहिल्यांदा ९ वाजून १६ मिनिटांनी परिसरात अंधार झाला. त्यानंतर पुन्हा ९ वाजून ४५ मिनिटांनी लाईट गेली. त्यानंतर पुन्हा १५ मिनिटांनी १० वाजता लाईट आली. टाटा पॉवरच्या संचात तांत्रिक बिघाड झाल्यानं लाईट गेल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. दरम्यान, अचानक स्टेशनवरील लाईट गेल्यानं तेथील परिसरात बराच वेळ गोंधळाचं वातावरण होतं.