मुंबई: पवई तलाव हा फिरायला जाण्यासाठी मुंबईतल्या प्रेमी युगुलांचं हक्काचं ठिकाण. पण दोन दिवसांपूर्वी या भागात एका मगरीने अचानक एंट्री घेतली आणि सगळ्यांची दाणादाण उडवून दिली.
काही नागरिकांनी सतर्कता दाखवून काठीच्या सहाय्याने मगरीला पुन्हा एकदा तलावात जाण्याचा रस्ता करुन दिला. सुरुवातीला नागरिकांच्या गोंधळामुळे घाबरलेली ही मगर रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करत होती. पण सुदैवाने हा प्रकार टळला आहे.
पण सध्या तलावाच्या किनाऱ्यावर साचलेला गाळ तसाच पडून आहे, कित्येक तक्रारीनंतर यावर पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. पावसाळ्यात चिखल आणि गाळ मगरींसाठी पोषक वातावरण मानलं जातं, त्यामुळेच ही मगर इथे आली असल्याचा स्थानिकांचा अंदाज आहे.