मंत्रिमंडळ विस्ताराबाबत रावते, देसाई मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
एबीपी माझा वेब टीम | 07 Jul 2016 09:01 AM (IST)
मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे दिवाकर रावते आणि सुभाष देसई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या विभागप्रमुखांची मातोश्रीवर चर्चा झाली. त्यानंतर रावते आणि देसाई मुख्यमंत्र्याच्या भेटीला पोहोचले आहेत.