मुंबई: दादरच्या शिवाजी पार्कमधील (Shivaji Park) स्विमिंग पूलमध्ये आलेली मगर ही शेजारच्या प्राणी संग्रहालयातीलच स्पष्ट झालं आहे. याबाबतचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यातून ही मगर शेजारीच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून आल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या प्रकरणी प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने केली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, मगर सापडल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता. मात्र आता मगर शेजारीच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करावा. बेकायदेशीररित्या हे प्राणी संग्रहालय चालवलं जातंय आणि तिथे प्राण्यांची तस्करी देखील होते.
काय आहे प्रकरण?
मुंबईच्या शिवाजी पार्कमधल्या (Shivaji Park) महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये (Mahatma Gandhi Memorial Swimming Pool) एक मगर आढळली. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. एका कर्मचाऱ्याने मगरीला पाहिल्यानंतर तिला पकडून ड्रममध्ये ठेवलं. यादरम्यान मगरीने एका कर्मचाऱ्याला चावा देखील घेतला. हाटे 5.30 वाजताच्या सुमारास तरण तलावाचे निरीक्षण करीत असताना ऑलम्पिक आकाराच्या आणि शर्यतीसाठीच्या तरण-तलावात (Olympic size Racing Swimming Pool) मगरीचे पिल्लू आढळून आले होते. त्यानंतर सहा तासांनी मगर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. याआधी देखील अजगर आणि सापासारखे अनेक प्राणी त्याच प्राणीसंग्रहालयातून सुटून बाहेर पडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती, त्यामुळे या प्राणीसंग्रहालयावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देखील अशीच मागणी केली आहे.
प्राणीसंग्रहालयाचे मालक कोण?
सध्या ही जागा वाईल्ड लाईफ वाँडरर्स नेचर फाउंडेशन यांच्या मालकीची आहे, तर ही जागा नंदकुमार मोघे यांच्या मालकीची आहे. नंदकुमार मोघे आयएएस ऑफिसर होते, ते महाराष्ट्र सरकार मध्ये वाईल्ड लाईफ ॲडव्हायझर, मुंबई महानगरपालिकेमध्ये वाइल्डलाइफ अँड झू अडवायझर, महाराष्ट्र सरकारच्या टायगर सफारीचे को चेअरमन अश्या विविध मोठ्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि नंदकुमार मोघे यांचे घरचे संबंध होते. महाराष्ट्रातील अनेक अभयारण्य आणि राष्ट्रिय उद्याने तयार करण्यात बाळासाहेबांनी मोघे यांना प्रोत्साहन दिले होते, सध्या मोघे घरीच असतात, त्यांचा मुलगा युवराज मोघे ही फाउंडेशन आणि प्राणी संग्रहालय सांभाळतो.
हे ही वाचा :