Mumbai Corona Update : मुंबईतील (Mumbai) आटोक्यात आलेली रुग्णसंख्या आजही कायम असून सोमवारी रुग्णसंख्या 100 च्या आत आढळली होती. आज देखील 77 नवे कोरोनाबाधित आढळले असून कालच्या तुलनेत चार अधिक रुग्ण आढळले आहेत. दरम्यान कमी झालेल्या या रुग्णसंख्येमुळे मुंबईकरांसह पालिका प्रशासनालाही (BMC) मोठा दिलासा मिळाला आहे. 


मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 77 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 135 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 757 इतकी झाली आहे. मुंबईच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 77 रुग्णांपैकी 15 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 35 हजार 932 बेड्सपैकी केवळ 692 बेड वापरात आहेत. कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याने मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा दरही वाढत आहे. आज हा दर 5279 वर पोहोचला आहे. 



देशात 6,915 नवे कोरोनाबाधित


गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6 हजार 915 नवीन रुग्ण आढळून आले असून 180 जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान 16 हजार 864 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 कोटी 29 लाख 31 हजार 45 झाली आहे. तर आतापर्यंत 5 लाख 14 हजार 23 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजार 472 वर पोहोचली असून एकूण बरे झालेल्यांची संख्या 4 कोटी 23 लाख 24 हजार 550 वर गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाख 14 हजार 23 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचे सक्रिय रुग्ण 92 हजार 472 वर पोहोचले आहेत, तर एकूण बरे झालेल्यांची संख्या 4 कोटी 23 लाख 24 हजार 550 वर गेली आहे.


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha