Mumbai Corona Update : मुंबईत (Mumbai) आज आढळलेली नव्या कोरोनारुग्णांची (Mumbai Corona Update) संख्या ही काहीशी अधिक असल्याने नागरिकांसह पालिकेला विचार करण्याची वेळ आली आहे. आज मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 73 कोरोनाबाधित आढळले असून 51 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.  



नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 331 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 73 रुग्णांपैकी पाच रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेकडील 26 हजार 151 बेड्सपैकी केवळ 13 बेड सध्या वापरात आहेत. मुंबई पालिका क्षेत्रात 73 कोरोनाबाधित आढळले असून आसपासच्या क्षेत्राचा विचार करता, ठाणे पालिका क्षेत्रात सात, मीरा-भाईंदर येथे एक असे रुग्ण आढळले आहेत. 


राज्यात 124 नवे कोरोनाबाधित


राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत  (Corona Update) हळूहळी वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.  बुधवारी राज्यात  केवळ 124  रुग्णांचे निदान झाले आहे. कालपेक्षा आज रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे.  राज्यातील  ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील  एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 724 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 41 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 113 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,26, 903  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha