Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोनारुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून आटोक्यात आली असून आजही 100 हून कमी नवे रुग्ण आढळले आहेत. आज 64 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 64 कोरोनाबाधित आढळले असून 80 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसंच एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. 


दरम्यान मुंबईत कमी आढळणाऱ्या रुग्णांमुळे कोरोना रुग्ण दुपटीचा दरही वाढत आहे. आज हा दर थेट 9 हजार पार गेला असून 9266 दिवसांवर पोहोचला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 405 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 64 रुग्णांपैकी 06 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 28 हजार 523 बेड्सपैकी केवळ 204 बेड वापरात आहेत.



राज्यात 452 नवे कोरोनाबाधित


राज्यात आज नवे 452 कोरोनाबाधित आढळले असून काल (9 मार्च) 359 रुग्ण आढळले होते. आरोग्य विभागने दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत राज्यात कोरोनाच्या 452 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 494 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. याशिवाय 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  राज्यात आज चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 19 हजार 594 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.09 टक्के आहे. सध्या राज्यात 22 हजार 225 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 599 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha