Mumbai Corona Update : कोरोनारुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी प्रमाणात आढळत असून 100 हून कमी नवे रुग्ण दररोज आढळत आहेत. आज देखील 54 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. मुंबई महानगरपालिकेने आज दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 54 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 100 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसंच एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 421 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 54 रुग्णांपैकी 11 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 28 हजार 702 बेड्सपैकी केवळ 237 बेड वापरात आहेत. कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा दर 7650 दिवसांवर पोहोचला आहे.
राज्यात शून्य मृत्यूंची नोंद
राज्यात आज शून्य रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. तसंच 559 जण कोरोनामुक्त झाले असून 359 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 77 लाख 19 हजार 100 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्के आहे. सध्या राज्यात 27 हजार 116 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 604 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 84 लाख 19 हजार 100 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
हे ही वाचा -
- Coronavirus Update : कोरोनाची चौथी लाट येणार का? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात...
- Mumbai Metro New Timings : आता उशिरापर्यंत करता येणार मेट्रोप्रवास, घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोचं नवं वेळापत्रक जाहीर
- Mumbai Local Train : मुंबईत लोकल प्रवासासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस अनिवार्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha