Mumbai Corona Update : मुंबईत (Mumbai) कोरोनाबाधितांची (Corona) संख्या आता आटोक्यात आल्याचं दिसून येत आहे. कारण मागील काही दिवस नव्या कोरोनाबाधितांची (Mumbai Corona Updates) संख्या 100 च्या आतच दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 46 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 102 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 519 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 46 रुग्णांपैकी 5 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


राज्यात 362 नवे कोरोनाबाधित


आरोग्य विभागाने दिलेल्या महितीनुसार, रविवारी राज्यात 362 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मागील 24 तासांत राज्यात (Maharashtra Corona Update) 688 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 77,17,362  इतकी झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.08 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या 3,709 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात एक हजार 318 सक्रिय रुग्ण आहेत. तर मुंबईत 519, ठाण्यात 325, अहमदनगरमध्ये 354 आणि नाशिकमध्ये 225 सक्रिय रुग्ण आहेत. 


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha