Mumbai Corona Update : मुंबईत कमी होणारी रुग्णसंख्या आजही कायम राहिली आहे. काल 447 रुग्ण आढळले असताना आज 441 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 441 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 115 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 4 हजार 096 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 840 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 32 दिवसांची वाढ झाली आहे. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.08% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत नऊ रुग्णांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
सध्या मुंबईत केवळ एक इमारत सील करण्यात आली आहे. तसंच आज नव्याने सापडलेल्या 441 रुग्णांपैकी 65 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 991 बेड्सपैकी केवळ 1 हजार 268 बेड वापरात आहेत.
मुंबईतील रात्रीची संचारबंदी मागे
मागील काही दिवसांपासून झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना रग्णसंख्या घटल्यानं मुंबईतील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून, मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली आहे. तसेच मुंबईतील समुद्र किनारे, गार्डन, पार्क खुले होणार आहेत. याशिवाय स्विमींग पूल, वॉटर पार्क, थिम पार्क 50 टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत.
हे ही वाचा :
- Covid19 Death : फ्रंटलाईन वर्कर्सच्या कुटुंबीयांना 808 कोटींची नुकसानभरपाई, जाणून घ्या तुमच्या राज्यासाठी किती रक्कम
- Covid19 : सावधान! सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळले कोरोनाचे चार 'गुप्त' प्रकार, धोका वाढण्याची शक्यता
- कोरोनाकाळात रुग्णांकडून घेतलेले जास्तीचे पैसे परत न करणाऱ्या रुग्णालयांची नोंदणी रद्द करणार, जिल्हा शल्यचिकित्सकांचा इशारा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha