BJP leader Kirit Somaiya :  मी आयुष्यात कधी विडी, सिगारेट बिअरही प्यायलो नाही. अंडही खाल्लं नाही. ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची माझ्यात नशा असल्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले. मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी राज्य सरकारवर पुन्हा आरोपांची फैरी झाडली.  उद्धव ठाकरेंच्या माफियागिरीला संपवण्याची नशा असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटले. 


कोव्हिड सेंटरच्या निविदेत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. कोव्हिड रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केले असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. वडील आदेश देतात की त्या कंपनीला काम देऊ नका पण त्यांचेच पुत्र आदित्य ठाकरे त्या कंपनीला काम देत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. 


मुंबई-पुणेकरांचा जीव धोक्यात घातला


कोविड रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला. पैशासाठी तुम्ही मुंबई आणि पुणेकरांचा जीव धोक्यात घातला असल्याचे सांगत सोमय्यांनी म्हटले की, 58 कोटींचे कंत्राट सुजित पाटकर यांना मुंबई महापालिका आयुक्त चहल यांनी दिले. हा सुजित पाटकर संजय राऊत यांचा भागिदार आहे. सुजित पाटकर याने एक नाही तर अशी सात कंत्राटे मिळवली आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणीदेखील सोमय्या यांनी केली आहे. 


...म्हणून संजय राऊत यांचा आकंडतांडव 


संजय राऊत आणि त्यांच्या मित्र परिवाराने काळी कामे केली असल्याचा आरोप यावेळी सोमय्या यांनी केला. प्रवीण राऊतला अटक झाली म्हणून संजय राऊत बोंबलत असल्याचे त्यांनी म्हटले. आपलीदेखील चौकशी होणार याची भीती राऊत यांना वाटत असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha