मुंबई : नवाब मलिक यांच्या अटकेसाठी भाजप नेत्यांकडून आज मुंबईत आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी ईडीच्या कारवाया होणार असल्याचा दावा केला आहे. नवाब मलिकांच्या केसमध्ये हा देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा प्रकार असल्याचं सांगत त्यांच्या अटकेची मागणी त्यांनी केली. यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही मविआ नेत्यांची यादी जाहीर केली. यातील अनेकांवर लवकरच कारवाई होणार असल्याचं पाटील म्हणाले.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. आज महाविकास आघाडी आणि भाजपकडून आंदोलन करण्यात आले. नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मंत्री मंत्रालयाजवळ आंदोलन केलं. तर, मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आंदोलन करण्यात केलं. यावेळी भाजपचे विविध नेते उपस्थित होते. त्याचवेळी चंद्रकांत पाटील यांनी लवकरच आणखी काही मविआ नेत्यांवर ईडीची कारवाई होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. 

सोमय्यांनी जाहीर केली यादी

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या 12 नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. अनिल देशमुख- नवाब मलिकांनंतर अटकेसाठी कोणाचा नंबर? यावर किरीट सोमय्या यांनी चेंडू शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला आहे. पत्रकार विचारतात आता कुणाचा नंबर, पण त्यासाठी चिट्ठी काढावी लागेल. ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काढावी आणि कोणाला आधी तुरुंगात पाठवायचं हे त्यांनीच ठरवावं, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी मुंबईत केले आहे. या यादीत पुढील नावं आहेत.- 

1. अनिल परब2. संजय राऊत3. सुजित पाटकर4. भावना गवळी 5. आनंद आडसुळ6. अजित पवार७. हसन मुश्रीफ8. प्रताप सरनाईक9. रविंद्र वायकर10. जितेंद्र आव्हाड 11. अनिल देशमुख12. नवाब मलिक 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha