इतरांना ही टेंडर का मिळाली नाही, कोव्हीड इमर्जन्सी आणि इ टेडरिंगच्या नावाखाली हा घोटाळा बीएमसीकडून करण्यात आला असून याची तक्रार महापालिका लेखापाल, लोकायुक्त, मुख्यमंत्री यांच्याकडे मनसे करणार असल्याचे संदिप देशपांडे यांनी सांगितले.
महापौरांच्या मुलाच्या कंपनीला कंत्राट कसे?
कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री यांनी वक्तव्य केले की सगळ्यानी सहकार्य करा. पण यामध्ये बीएमसीमधला पक्ष शिवसेना हा भ्रष्टाचारच्या मार्गाने जाताना पाहायला मिळतोय. कोव्हीडचे जम्बो सेंटर उभरण्यात आले, त्यात इमर्जन्सीच्या ई टेडरिंगच्या नावाखाली घोटाळा झाला आहे. ज्यांना ही काम दिली गेली आहे, त्यांना या कामाचा आधी अनुभव आहे का? हे सुद्धा बघितलं गेलेलं नाही. आमच्याकडे अनेक तक्रारी या जम्बो कोव्हिड सेंटर बाबत येत होत्या. किश कोपरपोर्टेट सर्व्हिसेस इंडिया या कंपनीच्या या पर्चेस ऑर्डर आहेत. ही कंपनी कुठली आहे? याबाबत आम्ही माहिती काढली. साइट्स बघितली, कुठलाही अनुभव नाही.
Swachh Sarveskshan 2020 : देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या स्थानी, इंदूर पुन्हा अव्वल
महापौर यांनी तात्काळ राजीनामा; मनसेची मागणी
यामध्ये डिरेक्टर मध्ये काही नाव आहेत, या कंपनीच्या नावांमध्ये साईप्रसाद पेडणेकर हे नाव आता सांगायची गरज नाही. महापौरांनी स्वतःच्या मुलाला पदाचा गैरवापर करून हे काम दिल आहे. वरळी व इतर कोविड सेंटर मधील कामंही या कंपनीला दिली आहेत. काही एनजीओची काम सुद्धा दिली आहे. कोव्हीडच्या नावावर हा भ्रष्टाचार झालेला आम्ही विसरणार नाही. महापौर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केलीय.
महानगरपालिका लेखपरिक्षक, लोकायुक्त सोबत मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा याबाबत आता आम्ही तक्रार करणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली. महापौरांच्या मुलांनाच कसे काम दिल गेले? याच स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाही. सभागृह सुरू व्हावं, स्थायी समिती बैठक का होऊ शकत नाहीये? व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे का होत नाही? कारण त्याना भीती वाटतीये हे सगळं बाहेर येईल, असाही आरोप संदिप देशपांडे यांनी यावेळी केली.
Mumbai Mayor | कंपनीला काम देताना नियम मोडले हे सिद्ध करावं, मुंबईच्या महापौरांचं मनसेला आव्हान