Mumbai Corona Update : मुंबईत (Mumbai) नव्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्यामध्ये सातत्याने घट होत आहे. शनिवारी मुंबईत फक्त 89 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज आढळलेल्या 89 रुग्णांपैकी फक्त 20 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. तर सहा रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. 89 रुग्णांपैकी 69 रुग्णांना कोणताही लक्षणे नाहीत, त्यामुळे त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, दररोज होणाऱ्या कमी रुग्णसंख्येमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मुंबई पालिका प्रशासन (Mumbai BMC) निर्बंधामध्ये आणखी शिथिलता आणणार का? हे पाहावं लागेल. मुंबईत आज एकाही कोरोनाबाधिताचा (Corona Deaths) मृत्यू झालेला नाही.
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईत 89 नव्या रुग्णांची भर पली आहे. तर 200 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज आढललेल्या रुग्णापैकी 82 टक्के म्हणजेच 69 रुग्णांना कोणताही लक्षणे नाहीत. तर 17 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. त्याशिवाय सहा रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. शनिवारी मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 902 इतकी झाली आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी चार हजार 450 दिवसांवर पोहचला आहे. शनिवारी आढललेल्या 89 रुग्णांपैकी 17 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 308 बेड्सपैकी केवळ 807 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे.
सगळे निर्बंध लवकरच उठवू, कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही: आदित्य ठाकरे
राज्यातील कोरोनाचे (Maharashtra Corona Update) आकडे दिवसेंदिवस कमी येत असल्यानं आता पूर्णपणे निर्बंध हटवण्याबाबत चर्चा सुरु आहे. यासंदर्भात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya Thackeray) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सगळे निर्बंध लवकरच उठवू, कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. मुंबई पालिकेच्या शाळा दोन मार्चपासून पूर्ण क्षमतेनं सुरु होणार, असल्याची माहिती देखील आदित्य ठाकरेंनी दिली.