मुंबई : जातपंचांची मुजोरी मोडीत काढण्यासाठी सरकारनं कायदा केला. मात्र त्याचा धाक निर्माण झाला नाही. त्यामुळे जातपंचांच्या जाचाविरोधात दाद मागण्यासाठी एका दाम्पत्याला थेट मंत्रालयाच्या दारात गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन यावं लागलं आहे.


 

कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे या गावात देवाळेकर दाम्पत्य राहतं. या दाम्पत्याला 2006 पासून गावातील जातपंचांनी वाळीत टाकलं आहे. गावातील रुढी पंरपरांना विरोध केल्यामुळे हा प्रकार घडला.

 
गेल्या वर्षी या दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली. त्यावळे मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. मात्र काहीही कारवाई झाली नाही. यंदा गणपती उत्सवासाठी हेवाळेकर दाम्पत्य गावात गेलं असता जातपंचांनी त्यांना गावात प्रवेश नाकारला. त्यामुळे आता कुटुंबियांनी मंत्रालयाच्या दारात ठाण मांडून बसावं लागत आहे.