मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सर्व स्तरावर उपाययोजना करत आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतेच शहर उपनगरात ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी निविदा काढल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया प्रशासकीयदृष्ट्या पारदर्शी नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. ऑक्सिजन प्लांट उभारणीमध्ये वसई-विरार महानगर पालिकेने मागवलेल्या दरापेक्षा मुंबई महापालिका दुप्पट दराने याची उभारणी करत असल्याची बाब निदर्शनास आणून देत या प्रकल्पात भ्रष्टाचार होण्याची शक्यता भाजपचे मुबई महापालिकेचे पक्षनेता विनोद मिश्रा यांनी वर्तवली आहे. त्यामुळे याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सर्व स्तरावर उपाययोजना करत आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतेच शहर उपनगरात ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी निविदा काढल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया प्रशासकीयदृष्ट्या पारदर्शी नसून यासारख्याच प्रकल्पासाठी वसई-विरार महानगरपालिकेने काढलेल्या निविदेपेक्षा बृहन्मुंबई महापालिका दुप्पट अधिक खर्च करत असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकल्पात भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याने त्याची सखोल चौकशी महानगरपालिका आयुक्तांनी करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.


Maharashtra Corona Update : राज्यात आज 40, 956  रुग्णांची नोंद, तर 71,966 रुग्ण कोरोनामुक्त


ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी सर्व पातळ्यावर स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न होत आहे. त्याचाच भाग म्हणून वसई-विरार महानगरपालिकेनेही निविदा प्रक्रिया काढल्या आहेत. यातील टेक्नोमेट निविदाकाराचा दर हे मुंबई महानगरपालिका प्रशासनातील निविदा प्रक्रियेतील दरांच्या तुलनेत कमी आहे. त्याच ऑक्सिजन प्लांट उभारणी प्रकल्पाकरिता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दुप्पट अधिक खर्च करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.


मुंबईत खासगी कामाच्या ठिकाणी आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये लसीकरणास परवानगी, बीएमसीकडून मार्गदर्शक सूचना जारी


ऑक्सिजननिर्मिती तातडीने युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे, म्हणूनच यावर तातडीने चौकशी व कार्यवाही करावी जेणेकरुन योग्य दरास आणि दर्जात्मक ऑक्सिजन पुरवठा मुंबईकरांना त्वरित झाला पाहिजे, असे पक्षाचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.