मुंबई : जगभरात आपले हात पाय पसरणारा कोरोना आता दिवसेंदिवस अधिक घातक होत चाललाय. कारण, तपासणी करुन आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर योग्य ते उपचार आणि त्या व्यक्तीपासून कुणाला संसर्ग होऊ नये याची खबरदारी आपण घेत आहोत. मात्र अशा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती पेक्षाही जास्त धोका आहे तो कोरोनाच्या सायलेंट कॅरिअरचा. कोण असतात कोरोनाचे सायलेंट कॅरिअर आणि त्यामुळे काय धोका आहे, पाहुयात.


सर्दी, ताप खोकला ही कोरोनाची अगदीच सामान्य लक्षणं आहेत. परदेश प्रवास किंवा हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि सोबत अशी लक्षणे दिसली तर तातडीनं त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट केली जाते. मात्र कोरोनाची सध्याच्या काळातली लक्षणं काही ठिक नाहीत. कारण कोरोना शरीरात ठाण मांडून बसल्यानंतरही त्याची कोणतीच लक्षणे दाखवत नाही. आणि यामुळेच आता सगळ्याच वैद्यकीय तज्ज्ञांना बुचकळ्यात पडायला झालं आहे. सायलेंटली शरिरात प्रवेश करणाऱ्या आणि कोणतीच लक्षणं न दाखवणाऱ्या अशा व्यक्ती कोरोनाचे सायलेंट कॅरिअर ठरत आहे.

सायलेंट कॅरिअर म्हणजे नेमकं काय?


आरोग्य विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण सायलेंट कॅरिअर आहेत. म्हणजे 70 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची सामान्य लक्षणे सुद्धा दिसली नाहीत. सर्दी, ताप, खोकला ही सामान्य लक्षणे असलेल्या कोरोना व्हायरसची वर्तवणूक बदलतेय. चीनच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, जगातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येपैकी एक तृतीयांश लोकांमध्ये लक्षणेच आढळलेली नाहीत. म्हणजे असे लोक ज्यांना कोरोनाची लागण तर झाली पण त्यांच्यात लक्षणे दिसली नाहीत किंवा बऱ्याच उशीरा दिसली. याच अहवालात अशा कोरोना कॅरिअरचा उल्लेख सायलेंट कॅरिअर असा केला गेलाय.

सायलेंट कॅरिअर असणारे हेच लोक त्यांच्या आजूबाजूला कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी कारणीभूत ठरली. सामान्यत: कोरोनाची लक्षणे पाच दिवसात बघायला मिळतात. पण या लोकांमध्ये तीन आठवड्यानंतर लक्षणे दिसली. ती सुद्धा फार कमी होती. मग अशा सायलेंट कॅरिअर्सना ओळखायचं कसं? कारण आपल्यापैकी कुणीही अगदी तुम्ही आम्ही सुद्धा कोरोनाचे सायलेंट कॅरिअर असू शकतो. कोरोनाची वर्तवणूक बदलल्यानं धडधाकट माणसालाही कोरोना होऊ शकतो. तो झाल्याचं समजणारही नाही. तो बराही होईल, पण त्याचं संक्रमण आजुबाजूला प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या माणसाला होईल.


संबंधित बातम्या






Coronavirus | लक्षण नसतानाही अनेक जण कोरनाबाधित