घर पिपली लाईव्ह सारखं झालंय - ज्ञानदा कदम
13 वर्षाच्या करियरमध्ये हे पहिल्यांदाच करत होते. हा फार जबरदस्त अनुभव होता. मात्र यात प्राउड करावं असं नाही. अशा कारणासाठी हे करावं लागणं आनंददायी मुळीच नाही. हे माझ्या घरासाठी, कॉलनीसाठी नवं होतं. माझं घर म्हणजे पिपली लाईव्ह सारखं झालं होतं. यासाठी घरच्यांनी फार सपोर्ट केला. स्टुडिओत काम करणं वेगळं असतं, कारण तिथं सगळं रेडी असतं. मात्र इथं सगळी तयारी करावी लागली. हा प्रयोग नवा होता मात्र अशी वेळ परत येऊ नये, अशी प्रतिक्रिया एबीपी माझाच्या अॅंकर ज्ञानदा कदम यांनी दिली.
Coronavirus | मुंबई लोकल पूर्णपणे बंद, देशभरातील रेल्वे वाहतूकही 31मार्चपर्यंत बंद
वॉर अगेन्स्ट वायरस जिंकूया- अश्विन बापट
ज्या क्षणी मला कळलं की, घरातून बुलेटिन करायचंय, त्याच क्षणापासून उत्सुकता होती की हे नेमकं कसं वर्क होणार आहे. म्हणजे आम्हीच गेले काही दिवस वर्क फ्रॉम होमच्या बातम्या सातत्याने देत होतो. ते वर्क फ्रॉम होम आज स्वत:च केलं. आपल्या माणस आजूबाजूला. म्हणजे आई-बाबा, बायको आणि मुलगी आणि मी न्यूजबुलेटिन करतोय. या सध्याच्या काळात आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना आमच्यासारखे मीडियाचे प्रतिनिधी ऑफिसला जातायत, ते केवळ याच मंडळींच्या पाठिंब्यामुळे. त्यांचं भक्कम पाठबळ खूपच मॅटर करतं. त्या आईबाबांशी, बायकोशी लाईव्ह बुलेटिनमध्ये बोललो, हाही एक वेगळा अनुभव. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत वर्क फ्रॉम होम करताना ही आमची शस्त्रंच जणू. आमची ताकद वाढवणारी. इथे घरातून बुलेटिन करायचं असलं तरी त्याचं गांभीर्य जाऊ न देणं, एक्साईटमेंटमध्ये इतरांना कळल्यावर घरात गर्दी न होऊ देणं, याचं भान पाळणं गरजेचं होतं. कारण अर्थात प्रश्न आरोग्याचा, संसर्गजन्य रोगाचा आहे. त्यामुळे तो समतोल राखत, तरीही घरच्या वातावरणातील थोडी मोकळीक घेत अँकरिंग केलं. यावेळी मला ऑफिसमधील माझ्या सहकाऱ्यांचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. म्हणजे अँकर टीम तसंच प्रॉडक्शन, असाईनमेंट, कॅमेरासह अन्य टीममधील सहकारीदेखील. ज्यांच्या उत्तम समन्वयामुळे हे शक्य झालं. प्रेक्षकांनाही अँकरिंगचा हा प्रयत्न भावल्याचे खूप मेसेज आले, सगळ्यांचीच मेहनत फळाला आल्याचं समाधान वाटलं. तसं पाहिलं तर हा एक वेगळ्या प्रयोगाचा त्याच वेळी सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा एक प्रयत्न. त्याचा मी एक भाग झालो, याचंही वेगळं समाधान आहे. असेच संघटित राहूया. वॉर अगेन्स्ट वायरस जिंकूया. प्रेक्षकांचीही साथ राहू द्या. घरीच राहूया, कोरोनाला पराभूत करुया.
#Coronavirus | महाराष्ट्र लॉकडाऊन! संपूर्ण राज्यात आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू : मुख्यमंत्री
सांभाळून काम करत आहेत रिपोर्टर्स
दरम्यान या काळात एबीपी माझाचे रिपोर्टर देखील प्रत्येक घडामोड आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी फिल्डवर कार्यरत आहेत. मात्र ते अत्यंत खबरदारी घेऊन काम करत आहेत. मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमचे रिपोर्टर अत्यंत काळजीपूर्वक कोरोना तसंच कर्फ्युबाबत अपडेट पोहोचवत आहेत.
माझाच्या डिजिटल टीमचंही वर्क फ्रॉम होम
एबीपी माझाच्या सर्व बातम्या आणि अपडेट आपल्याला या बंदच्या काळात वेबसाईट, युट्युब आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून सातत्याने देण्यात येत आहे. अचूक, वेगवान आणि विश्वसनीय असं अपडेट या काळात एबीपी माझाच्या डिजिटल टीमकडून देण्यात येत आहेत. यासाठी माझाची डिजिटल टीम देखील जनता कर्फ्यु दरम्यान आपापल्या घरूनच हे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. आपल्याला जर ताज्या बातम्या आणि कोरोना संदर्भात अधिक माहिती, विश्वसनीय माहिती हवी असेल तर एबीपी माझाच्या वेबसाईटला, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका.