मुंबई : कोरोनाची बाधा नसलेल्या व असलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयांमधील 80 टक्के खाटा शासन निर्धारित अटी व शर्तींनुसार उपयोगात आणण्याबाबत महापालिका आयुक्तांनी बैठक घेतलीकोरोना कोविड 19 या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेली परिस्थिती ही अपवादात्मक परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कोविडची बाधा असलेल्या व कोविडची बाधा नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांना अधिकाधिक योग्य पद्धतीने उपचार मिळणे गरजेचे आहे.


याकरिता खाजगी रुग्णालयांमधील खाटांचे नियोजन, वाटप व नियंत्रण हे केंद्रीय पद्धतीने आणि शासकीय स्तरावर होणे गरजेचे आहे. सर्वांना समान पद्धतीने खाटा वाटप व्हाव्यात, याकरिता खाजगी रुग्णालयांमधील 80 टक्के खाटा राज्य शासनाद्वारे निर्धारित करण्यात येणाऱ्या दरांनुसार आणि संबंधित अटी व शर्तीनुसार उपयोगात आणण्याचे राज्य शासनाच्या स्तरावर निश्चित करण्यात येत आहे.


या खाटा सध्या निश्चित करण्यात आलेल्या प्रमाणात कोविड बाधित व कोविडची बाधा नसलेल्या रुग्णांसाठीही केंद्रीय पद्धतीने वाटप करून उपयोगात आणण्यात येणार आहेत. यामुळे हृदयविकार किंवा इतर काही आजार असणाऱ्या व्यक्तींना देखील खाटा मिळणार असल्याने त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार मिळू शकणार आहेत. तसेच या खाटा फक्त कोविड रुग्णांसाठी वापरण्यात येणार असल्याचा कयास काही ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे, तो चुकीचा व निराधार आहे, असेही आजच्या बैठकीदरम्यान नमूद करण्यात आले.


सर्व खासगी रुग्णालयातील एकूण खाटांपैकी 80 टक्के खाटा या शासन निर्धारित दरांनुसार उपयोगात आणण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या खाटांचे सध्याच्या प्रमाणानुसार कोविडची बाधा असलेल्या रुग्णांना व कोविड नसलेल्या रुग्णांना केंद्रीय पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे. यानुसार शासनस्तरावर दरपत्रक आणि संबंधित अटी व शर्ती निर्धारित करण्यात येत आहेत.


संबंधित बातम्या




CM Thackeray Lockdown 4 | लॉकडाऊन उठवून महाराष्ट्राला धोक्यात टाकणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे