मुंबई : कोरोना संकटामुळे हँड सॅनिटाझर आणि मास्कचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा घेत अनेकजण या वस्तूंचा काळाबाजार करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकून असा अवैध माल जप्त करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. हँड सॅनिटाझर आणि मास्कचा अवैधरित्या साठा करणाऱ्या तीन मोठ्या कारवाया करत काळाबाजार करणाऱ्यांना चांगलीच चपराक लावली आहे.
धारावीतील तीन गोडाऊनमधून 27 लाख 25 हजार 500 रुपयांचा मास्कचा साठा जप्त करत 5 जनांना अटक केली. तर बेंगणवाडी, गोवंडी येथून चौघांना अटक करत 75 लाखांचा मास्कचा साठा जप्त केला. मुंबईच्या गोरेगाव येथून एका मेडिकल मधून दोन लाख 22 हजार 900 रुपयांचा साठा जप्त करत मेडिकल चालकाला अटक करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून तो रोखण्यासाठी हँड सॅनिटायझर आणि फेस मास्क हे गरजेचे आहे. त्यामुळे मागणी वाढल्यामुळे या वस्तूंचा पुरवठा करणे अवघड जात आहे. परिणामी या वस्तूंचा समावेश केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंमध्ये केला आहे..
हॅण्ड सॅनिटायझरचा साठा करणारी टोळी अटकेत, अडीच लाख किंमतीच्या 5 हजार बाटल्या जप्त
हँड सॅनिटाझर आणि मास्कचा काळाबाजार
हँड सॅनिटाझर आणि मास्कचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. आज एका दिवसामध्ये मुंबई गुन्हे शाखेने सलग तीन कारवाया करत वेगवेगळे दोन टोळ्या गजाआड केल्या आहेत. तर, एका मेडिकल चालकाने जास्त प्रमाणात हँड सॅनिटाझरचा साठा केल्याने त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये असंच चित्र मुंबईमध्ये पाहायला मिळतं आहे. जिथे एकीकडे 15 कोटींचा मास्कचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर एक कोटींचा मास्कचा साठा मुंबई पोलिसांकडून तर, 1 कोटींचे हँड सॅनिटाझर साठा मुंबई अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाया करण्यात आल्या. शासनाकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काहीजण यांचा गैरफायदा घेताना दिसत आहे.
#Corona | कोरोनाच्या भीतीने मास्क आणि सॅनिटायझरची वाढती मागणी, नामांकित कंपन्यांच्या सामानाचा तुटवडा