मुंबई : आशियातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा मुंबईतील परिसर म्हणजे, धारावी. गेल्या अनेक दिवसांपासून धारावी परिसर चर्चेत आला तो वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी धारावी नेहमीच चर्चेत होती. कोरोनाविरोधात दिलेला लढ्यासोबतच, गमावलेली बाजी कशी जिंकावी याची शिकवणही धारावीने दिली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील सर्वात मोठा कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.


धारावीला पूर्वपदावर आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी एप्रिलपासून अभियानाची सुरुवात केली होती. त्यांनी 47 हजार 500 घरोघरी जाऊन तापमान आणि ऑक्सिजन लेव्हलची तपासणी केली. 7 लाख लोकांची स्क्रिनिंग टेस्टही करण्यात आली. त्यानंतर कोरोनाच्या लक्षणांची ओळख पटवून त्या लोकांना जवळच्या शाळेत आणि स्पोर्ट्स क्लबमधील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं होतं. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच येथे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं दिसून येत आहे. याव्यतिरिक्त अर्ध्याहून अधिक रुग्ण जीवघेण्या कोरोना व्हायरसला हरवून बरे झाले आहेत.


कोरोनाविरूद्धच्या युद्धात धारावी बनली रोम मॉडेल


मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर धारावीसाठी कोरोना विरूद्धच्या युद्धात देवदूत ठरले आहेत. त्यांनी सांगितलं की, 'धारावीमध्ये सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करणं अजिबातच शक्य नव्हतं. माझ्यासमोर कोरोना रुग्ण आढळून येण्याची वाट पाहण्यापेक्षा कोरोनाचा पाठलाग करण्याचा पर्याय होता. आम्ही सुरुवातीच्या टप्प्यापासूनच लोकांना आयसोलेट करण्यास सुरुवात केली.' दिघावकर आणि त्यांच्या टीमने स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करणं न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील त्यांचा हेतू कोरोनाचा प्रादुर्भाव मर्यादित ठेवणं हाच आहे.


टेस्टिंग, स्क्रिनिंगच्या मदतीने धारावीतील स्थिती नियंत्रणात


धारावीत राबवण्यात आलेल्या योग्य रणनितीमुळेच मृत्यू दरात कमतरता आली आहे. जवळपास 51 टक्के धारावीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठिक झाले आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला हा आकडा 60 टक्क्यांवरून आता 20 टक्क्यांवर पोहोचला आहे. योग्य वेळी करण्यात आलेल्या योग्य उपाययोजनांमुळे धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यास मदत झाली आहे. रमझानमध्येही अधिकाऱ्यांनी फळं, खजूर आणि इतर पदार्थांची व्यवस्था केली होती. ज्यामुळे धार्मिक कार्यात कोणताही अडथळा आला नाही. तर इतर लोकांनाही दररोज तीन वेळेचं जेवण देण्यात आलं. धारावीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपण्याच्या मार्गावर आहे. परंतु, संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांना पितृशोक


अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकलची मर्यादित सेवा सुरु


मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 ची सुरुवात, सोमवारी 12 प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या