मुंबई : कोरोना व्हायरसमुळे आलेल्या साथीमुळे कोटक महिंद्र बँकेचे सीईओ उदय कोटक यांनी घोषणा केली आहे की यंदा ते वेतन म्हणून फक्त एक रुपया घेणार आहेत. एवढंच नाही तर पीएम केअर्स फंडामध्ये 25 कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचीही त्यांनी जाहीर केलं. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे होणारं नुकसान पाहता आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये केवळ एक रुपयाच वेतन घेणार असल्याचं उदय कोटक यांनी सांगितलं.


2019 या आर्थिक वर्षात उदय कोटक यांची बेसिक सॅलरी 27 लाख रुपये होती. कोटक महिंद्रा बँकेचं मुख्यालय मुंबईत आहे.


कोटक यांच्या या घोषणेनंतर याच ग्रुपच्या टॉप लीडरशिप टीमनेही वेतनामध्ये 15 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा बँकेने गुरुवार (9 एप्रिल) रोजी पत्रक जारी करुन याबाबत माहिती दिली. कोटक महिंद्रा बँक घोषणा करत आहे की, समुहाच्या टॉप लीडरशिप टीमने एकजूट होऊन आपल्या वेतनात 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात आर्थिक वर्ष 2021 साठी असेल, असं या पत्रकात म्हटलं आहे.


उदय कोटक यांनी वैयक्तिकरित्या आपलं वेतन म्हणून केवळ एक रुपयाच घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच पीएम केअर्स फंडात 25 कोटी रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याची माहिती कोटक महिंद्रा बँकेच्या पत्रकात देण्यात आली. याआधी कोटक महिंद्र ग्रुपने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 10 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तर स्वत: उदय कोटकही वैयक्तिकरित्या या फंडमध्ये 25 कोटी रुपयाचं दान केलं आहे.


उदय कोटक आणि कोटक महिंद्रा बँकेकडून 60 कोटींची मदत
कोटक महिंद्रा बँक आणि उदय कोटक यांनी एकत्रिकत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या सहाय्यता निधीमध्ये 60 कोटी रुपये जमा केले आहेत. पीएम केअर्स फंडमध्ये उदय कोटक यांनी वैयक्तिकरित्या 25 कोटी रुपये, तर कोटक महिंद्रा बँकेन 25 कोटी रुपये दान केले आहेत. महाराष्ट्र सहाय्यता निधीत उदय कोटक यांनी 10 कोटी रुपयांची मदत केली आहे.


Ratan Tata exclusive interview | दानशूर उद्योगपती रतन टाटा यांची विशेष मुलाखत | ABP Majha