मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात 210 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. परिणामी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1574 झाली आहे. तर, आज 13 जणांचा बळी गेला आहे. दिलायसादायक म्हणजे आजपर्यंत 188 लोक पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. राज्यात मुंबई आणि पुणे जिल्हा हे संवेदनशील झाली आहेत. मुंबईत सर्वाधिक 1008 रुग्णांची नोंद आहे. तर, त्याआखोखाल पुणे जिल्हात 254 रुग्णसंख्या आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाची रॅपीड टेस्ट घेण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


राज्यात कोरोनामुळे परिस्थितीत दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. अजून चार दिवसांनी देशातील लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्या प्रकारचे संकेत दिले आहेत.


 Coronavirus | देशात 24 तासात कोरोनाचे 678 नविन रूग्ण, 33 जणांचा मृत्यू : आरोग्य मंत्रालय


मुंबई महानगरपालिका रुग्ण संख्या 1008; मृत्यू 64
ठाणे 3 - 0
ठाणे मनपा 28 - 3
नवी मुंबई मनपा 32 -2
कल्याण डोबीवली मनपा 34 -2
उल्हासनगर मनपा 1 - 0
भिवंडी निजामपूर मनपा 0 - 0
मीरा भाईरंदर मनपा 21 - 1
पालघर 3 - 1
वसई विरार मनपा 12 - 3
रायगड 0 - 0
पनवेल मनपा 6 - 1
ठाणे मंडळ एकूण 1148 - 77


नाशिक 1 - 0
नाशिक मनपा 1 - 0
मालेगाव मनपा 5 - 1
अहमदनगर 9 - 0
अहमदनगर मनपा 16 - 0
धुळे 0 - 0
धुळे मनपा 0 - 0
जळगाव 1 - 1
जळगाव मनपा 1 - 1
नंदूरबार 0 - 0
नाशिक मंडळ एकूण 34 - 2
पुणे 7 - 0
पुणे मनपा 219 - 25
पिंपरी चिंचवड मनपा 22 - 0
सोलापूर 0 - 0
सोलापूर 0 - 0
सातारा 6 - 1
पुणे मंडळ एकूण 254 - 26
कोल्हापूर 0 - 0
कोल्हापूर मनपा 5 - 0
सांगली 26 - 0
सांगली मिरज कुपवाड मनपा 0 - 0
सिंधुदुर्ग 1 - 0
रत्नागिरी 5 - 1
कोल्हापूर मंडळ एकूण 37 - 1
औरंगाबाद 1 - 0
औरंगाबाद मनपा 16 - 1
जालना 1 - 0
हिंगोली 1 - 0
परभणी 0 - 0
परभणी मनपा 0 - 0
औरंगाबाद मंडळ एकूण 19 - 1
लातूर 0 - 0
लातूर मनपा 8 - 0
उस्मानाबाद 4 - 0
बीड 1 - 0
नांदेड 0 - 0
नांदेड मनपा 0 - 0
लातूर मंडळ एकूण 13 - 0
अकोला 0 - 0
अकोला मनपा 12 - 0
अमरावती 0 - 0
अमरावती मनपा 4 - 1
यवतमाळ 4 - 0
बुलढाणा 13 - 1
वाशिम 1 - 0
अकोला मंडळ एकूण 34 - 2
नागपूर 0 - 0
नागपूर मनपा 25 - 1
वर्धा 0 - 0
भंडारा 0 - 0
गोंदिया 1 - 0
चंद्रपूर 0 - 0
चंद्रपूर मनपा 0 - 0
गडिचरोली 0 - 0
नागपूर मंडळ एकूण 26 - 1
इतर राज्यातील 9 - 0
एकूण 1574 कोरोना बाधित अन् मृत्यू 110


आजपर्यंत 33093 जणांची कोरोना चाचणी झाली पैकी 1574 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38927 लोकं होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहेत. तर 4738 लोकांना सरकारी ठिकाणी क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.


Corona Awareness by Bharud | अग ग... भारुडातून कोरोना विषयी प्रबोधन | ABP Majha