नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होता आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 झाला आहे. यासोबतच कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासात 6 हजार 977 कोरोनाबाधित वाढले. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे. तर मागील 24 तासात 154 मृत्यूमुखी पडले. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 हजार 21 जणांचा मृत्यू झाला असून 57 हजार 721 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 41.57 टक्के आहे. तर मागील 24 तासांत 3 हजार 280 कोरोनामुक्त झाले.भारतात सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 77 हजार 103 आहे.


महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव
भारतात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्रात काल सर्वाधिक 3 हजार 41 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. राज्यात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजार 231 झाला आहे. त्यातील 14 हजार 600 बरे झाले. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आहे 29.06 टक्के आहे. तर मृतांचा आकडा 1635 आहे. सध्या राज्यात कोरोनाची लागण असलेले रुग्ण 33 हजार 988 आहे. मुंबईत 30 हजार 542 कोरोनाबाधित असून त्यामधील 988 जणांचा मृत्यू झाला आहे.


तर केरळमध्ये 847 रुग्ण असून त्यातील 521 बरे झाले आहे. तर चौघांचा मृत्यू झाला आहे. केरळचा रिकव्हरी रेट 61.51 टक्के आहे. गेल्या दहा-बारा दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढतेय त्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 61 टक्क्यांवर आला आहे.


महाराष्ट्राखालोखाल महत्त्वाची टॉप सात राज्य


- तामिळनाडू 16,277 रुग्ण, त्यापैकी 8,324 बरे झाले, मृतांचा आकडा 111, रिकव्हरी रेट 51.13 टक्के


गुजरात 14,056 रुग्ण, त्यामधील 6,412 बरे झाले, मृतांचा आकडा 858, रिकव्हरी रेट 45.61 टक्के


दिल्ली 13,418 रुग्ण, त्यातील 6,540 बरे झाले, मृतांचा आकडा 261, रिकव्हरी रेट 48.14 टक्के


राजस्थान 7,028 रुग्ण, त्यापैकी 3,848 बरे झाले, मृतांचा आकडा 163, रिकव्हरी रेट 54.75 टक्के


मध्यप्रदेश 6,665 रुग्ण, त्यामधील 3,408 बरे झाले, मृतांचा आकडा 290, रिकव्हरी रेट 51.13 टक्के


उत्तरप्रदेश 6,268 रुग्ण, त्यातील 3,538 बरे झाले, मृतांचा आकडा 161, रिकव्हरी रेट 56.44 टक्के


पश्चिम बंगाल 3,667 रुग्ण, त्यापैकी 1,339 बरे झाले, मृतांचा आकडा 272, रिकव्हरी रेट 35.51 टक्के


कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारतचा दहावा क्रमांक
भारतात कोरोनाबाधित पहिला रुग्ण 30 जानेवारी रोजी आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत एक लाख 38 हजार 845 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारताचा पहिल्या दहामध्ये समावेश झाला आहे. या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. यानंतर ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि तुर्की या देशांचे क्रमांक येतात.


देशात लॉकडाऊनचे दोन महिने पूर्ण
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू होऊन आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी पहिल्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. जो 25 मार्चपासून लागू झाली होती. यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून तीन वेळा वाढवण्यात आला. सध्या काही शिथिलतांसह लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मेपर्यंत सुरु राहिल.