मुंबई : कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे उद्योगधंदे सुरु होणे, याकरता सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव नाही. त्या जिल्ह्यांच्या सीमा सील करून तिथे काम सुरु करणे गरजेचं आहे. या सर्व पर्यायांवर आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.


ज्या जिल्ह्यात एकही रुग्ण नाही, तिथे 30 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये काम सुरू करण्याची मर्यादित परवानगी दिली पाहिजे. 30-30 टक्के कर्मचारी आळीपाळीने काम करता येईल अशी चर्चा बैठकीत झाली. तर राज्यात अनेक ठिकाणी ऊसतोड कामगार अडकले आहेत. त्यांची चाचणी करून या सर्व ऊसतोड कामगारांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्याबाबत देखील चर्चा बैठकीत झाली आहे.


संबंधित बातम्या :

मुंबईत सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी; वांद्रे स्टेशनबाहेर परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी

Coronavirus | भारताच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाची लस बनवण्याचा विडा उचलावा : मोदी

Bandra Crowd Issue | वांद्रे स्थानकावर हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी, गावी परत जाण्याची मागणी