मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 2940 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 65,168 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 34,881 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात 99 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2197 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 1084 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी राज्यात विक्रमी आठ हजारांच्यावर रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आहे.



आज झालेल्या 99 मृत्यूपैकी 40 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 6 ते 27 मे या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 59 मृत्यूपैकी मुंबई 35, पनवेल 7, ठाणे 6, वसई विरार 6, नवी मुंबई 2, कल्याण डोंबिवली 1, जळगाव 1 तर, एक मृत्यू इतर राज्यातील आहे.


आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी 65,168 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 660 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 35 हजार 420 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.


Lockdown 5.0 | लॉकडाऊन 5.0 मध्ये कोणकोणत्या गोष्टींसाठी मिळणार परवानगी


आज झालेल्या मृत्यूंपैकी 62 पुरुष तर 37 महिला आहेत. त्यातील 48 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 49 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर, 2 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 99 रुग्णांपैकी 66 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.


महाराष्ट्र एकूण रूग्ण – 65,168


मृत्यू - 2197




  • मुंबई महानगरपालिका- 38442 (मृत्यू 1227) बरे झालेले (16364)

  • ठाणे- 9123 (मृत्यू 182) बरे झालेले 2973

  • पालघर- 968 (मृत्यू 30) बरे झालेले 329

  • रायगड- 1042 (मृत्यू 39) बरे झालेले 549

  • नाशिक - 1111 (60) बरे झालेले 893

  • अहमदनगर- 108 (मृत्यू 6) बरे झालेले 57

  • धुळे - 140 (मृत्यू 16) बरे झालेले 71

  • जळगाव- 607 (मृत्यू 72) 272

  • नंदुरबार - 34 (मृत्यू 3) बरे झालेले 20

  • पुणे - 7537 (मृत्यू 320) बरे झालेले 3559

  • सातारा- 490 (मृत्यू 16) बरे झालेले 148

  • सोलापूर- 872 (मृत्यू 68) बरे झालेले 353

  • कोल्हापूर- 429 (मृत्यू 4) बरे झालेले 104

  • सांगली - 112 (मृत्यू 1) बरे झालेले 55

  • सिंधुदुर्ग- 33 बरे झालेले 7

  • रत्नागिरी- 242 (मृत्यू 5) बरे झालेले 90

  • औरंगाबाद -1462 (मृत्यू 65) बरे झालेले 986

  • जालना- 119 बरे झालेले 45

  • हिंगोली- 149 बरे झालेले 97

  • परभणी- 57 (मृत्यू 1) बरे झालेले 3

  • लातूर -118 (मृत्यू 3) बरे झालेले 55

  • उस्मानाबाद- 66 बरे झालेले 18

  • बीड - 46 बरे झालेले 5

  • नांदेड - 108 (मृत्यू 6) बरे झालेले 86

  • अकोला - 571 (मृत्यू 28) बरे झालेले 289

  • अमरावती- 213 (मृत्यू 16) बरे झालेले 121

  • यवतमाळ- 130 बरे झालेले 92

  • बुलढाणा - 58 (मृत्यू 3) बरे झालेले 29

  • वाशिम - 8 बरे झालेले 6

  • नागपूर - 556 (मृत्यू 10) बरे झालेले 353

  • वर्धा - 11 (मृत्यू 1)

  • भंडारा - 29, बरे झालेले 1

  • चंद्रपूर - 25, बरे झालेले 15

  • गोंदिया - 61, बरे झालेले 28

  • गडचिरोली- 32 बरे झालेले 8


राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3169 झोन क्रियाशील असून आज एकूण 17 हजार 917 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 68.51 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.



Unlock 0.1 देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला,अटी शर्तींसह धार्मिक स्थळ, हॉटेल्स सुरू करण्याची मुभा